प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत नामदेव कोल्हापूरे यांनी हॉटेल मालकाची एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हें अन्वेषनच्या पथकानी अटक करून त्यांना वाई येथील कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की,महाबळेश्वर येथे मेघदूत नावाचे हॉटेल आहे.या हॉटेल मालकाना मद्य विक्रीचा परवाना देतो असे सांगून अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करून दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगून त्यांच्या कडुन एक कोटी पाच लाख रुपये घेतले.त्यानंतर हॉटेल मालकानी परवाना बदल विचारले असता त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच त्यांनी मा.अप्पर पोलिस महासंचालक,गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.या प्रकरणी वाई येथे पोलिस ठाण्यात कोल्हापूरे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या अर्जाची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी चौकशी केली असता श्रीकांत कोल्हापूरे याचे साथीदार आरोपी हनुमंत विष्णुदास मुंडे,अभिमन्यु रामदास येडगे,आणि बाळु बाबासाहेब पुरी यांना अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलिस महासंचालक श्री .प्रशांत बुरडे,पोलिस उपमहानिरीक्षक श्री.बसवराज तेली.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले कोल्हापूर विभाग .या करीत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती.यात पोलिस उपअधीक्षक श्री.गणेश माळी,पोलिस निरीक्षक श्रीमती वर्षा कावडे यांच्यासह पोलिस विजय कुंभार,जमीर मुल्ला आणि स्वप्निल जाधव यांनी ठाणे येथे नाशिक -मुंबई खटवली टोल नाका येथे आरोपी श्रीकांत कोल्हापूरे यास ताब्यात घेतले आहे.