प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एसटी विभागाने टॉऊन हॉल एसटी बस स्टॉप मोडळीस आल्याच्या नावाखाली एसटी बस स्थानक पाडल्याने प्रवाशांसह नोकरदारवर्ग आणि विद्यार्थांची मोठा गैरसोय होत आहे.हा थांबा पाडुन दोन ते तीन वर्षे झाली पण संबंधित विभाकडुन एसटी बस स्थानक पुन्हा उभा करण्याचे स्वारस्य उरलेले दिसत नाही.
हा मार्ग जोतिबा,पन्हाळा आणि कोकण मार्ग असल्याने या थांब्यावर प्रवासी वर्गाची मोठी गर्दी असते.काही प्रवाशांनी एसटी विभागाच्या संबंधित विभागाकडे वारंवार निवेदन देऊन ही या विभागाचे दुर्लक्ष होत आहे.या थांब्यावर मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी किंवा उभारण्यासाठी कोणताही आसरा नसल्याने प्रवासी रस्त्यात एसटी येण्याची वाट पहात उभे राहतात.त्यामुळे भरधाव वेगाने येणारयां जाणारयां वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.याचा विचार करून एसटीच्या संबंधित विभागा कडुन पुन्हा एसटी बस स्थानकाची उभारणी करावी .किंवा तात्पुरता थांबा उभारावा अशी प्रवाशी वर्गातुन मागणी होत आहे.
आता तर सत्तेतल्या सरकारने महिला वर्गासाठी 50% आणि 75 वर्षावरील जेष्ठ नागरिक यांच्या साठी मोफत प्रवासाची सोय केल्याने एसटीला प्रवाशांची गर्दी वाढ़त आहे.आता पावसाळा संपत आल्याने नवरात्र सुरु होत असल्याने बाहेरुन येणारे प्रर्यटकांत भर पडत असल्याने टॉऊन हॉल एसटी स्थानकात तात्पुरते शेड उभा करण्याची मागणी होत आहे.