प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील वाशी येथील आकाश तानाजी कांबळे (वय 32) याने सोमवार दि.23/09/2024 रोजी पाचच्या सुमारास रहात असलेल्या घरात माळ्यावरील वाश्याला गळ्यात दोरीने गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी पावणे सहाच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,आकाश हा आपल्या कुंटुबिया समवेत करवीर तालुक्यातील वाशी येथे रहात होता.त्याची पत्नी माहेरी गेल्या होत्या.तर त्याचे आई वडील शेताकडे गेले होते. ते घरी परत आल्या नंतर त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.आकाश हा गंवडी काम करीत असून त्याच्या पश्च्यात पत्नी ,दोन लहान मुले, आई वडील आणि एक भाऊ आहे.