आरोग्य कर्मचाऱ्याचे गळफास घेऊन आत्महत्या.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कपूरवसाहत येथे रहात असलेला नेताजी विठ्ठल बुचडे(वय 46) याने गुरुवार दि.19/09/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास रहात असलेल्या घरात छताच्या पंख्याला नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा साडेबाराच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य कर्मचारी असून तेथे असलेल्या कामगार चाळीत कुंटुबिया समवेत रहात होता.घरी कुणी नसल्याचे पाहुन हा प्रकार केल्याचे समजते. त्याच्या पश्च्यात पत्नी व दोन मुले आहेत.त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post