प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - घरकामास असलेल्या ठिकाणी पावणे पाच लाख रुपये किमंतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी सिध्दवा लिंगाप्पा गर्गद (वय 40.रा.सध्या नागाळा पार्क.मुळगाव बेडसुळ ता.सौंदती ,जि.बेळगाव) हिला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून मुद्देमालासह शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,नागाळा पार्कातील हरीपुजावरम येथे आशिष अंबादास देशमुख हे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्यांची घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.याची फिर्याद आशिष देशमुख यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेत तपास करीत असताना आशिष देशमुख यांच्या घरात झालेली चोरी ही त्यांच्याकडे घरकामासाठी येत असलेल्या मोलकरीनीने केल्याची माहिती मिळाली असता महिला पोलिस यांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम उडवा उडवी केली.तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिच्या हावभावावरुन संशय आल्याने पोलिसांनी ती रहात असलेल्या घराची झडती घेतली असता तिच्याकडे एक जोड सोन्याच्या पाटल्या ,चार नग सोन्याचे बिल्वर आणि सोन्याचे टॉप्स मिळ्याल्याने या बाबत चौकशी केली असता काम करीत असलेल्या आशिष देशमुख यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी पावणे पाच लाख रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने जप्त करून त्या महिलेस मुद्देमालासह पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.