प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गगनबावडा तालुक्यातील अंसडोली येथे रहात असलेले रामचंद्र धोंडी हंकारे (वय 77) यांचा रविवार (दि.29) रोजी हेर्ले फाटा येथे झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्यास मार लागल्याने उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत हे आज सकाळी हेर्ले येथे लकव्या वरील आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी गेले होते.ते परत आपल्या गावी परत जाण्यासाठी हेर्ले फाटा येथे थांबले असताना कोल्हापूरच्या दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोकीस मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या गाववाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यु झाला.हा अपघात दुपारी साडे बारा ते एकच्या दरम्यान झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.