प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे रहात असलेले बाजीराव यशवंत नरके (वय 52 रा.मधली गल्ली ,हणमंतवाडी) यांचा बुधवार दि.25/09/2024 रोजी दुपारी अंदाजे एकच्या सुमारास रहात असलेल्या घरात झालेल्या मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी नऊच्या सुमारास मृत्यु झाला.त्यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसल्याचे समजते.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.