कागल येथे दोघां मातब्बरांच्या लढ़तीत तिसराच नवीन चेहरा असलेला बाजी मारण्याची शक्यता ?.

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल येथे आता पासूनच विधानसभेचे वारे वाहू लागले आहे.अनेकांनी सोईचे राजकारण  करून आपणच निवडून येणार म्हणुन गुड़घ्याला बांशिंग बांधुन बसलेले आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात राजकीय खेळी अत्यंत सावधपणे खेळल्याजात आहेत.त्यातच भाजपचे नेते समजित घाटगे यांनी भाजपला राम राम देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करून राजकारणाची समीकरणच बदलून टाकली.या मुळे आपणच निवडून येणार असा आत्मविश्वास असलेल्यांची झोपच उडवून टाकली म्हणायला हरकत नाही.घाटगे यांच्या प्रवेशाच्या निमीत्ताने कागल येथे आलेल्या मा.शरद पवार यांनी आपल्या भाषणात कागल येथे सत्तेत असलेल्या नेत्यावर जोरदार टिका करत लाचार शब्दाचा वापर करून त्यांची जागा दाखविण्याचा निर्धार करून जमलेल्या कार्यकर्त्यांना समरजित घाटगे यांना निवडून आमदार करा.मी त्यांना मंत्री करतो.असे सुतोवाच केले होते.

तर दुसरीकडे येणारी विधानसभा निवडणुक ही माझी सातवी असून प्रत्येक निवडणुकीत रंगत येऊन अटीतटीचा सामना होतो.आणि प्रत्येक वेळी कागलची जनता माझ्या पाठीशी ठामपणे आता प्रर्यत उभी राहिली असून येथून पुढ़े ही उभी राहिल असा विश्वास मंत्री मुश्रीफसो यांना आहे.ही येणारी विधानसभा निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असून राजा आणि प्रजा यातच निवडणुक होणार असून यात प्रजाच बाजी मारणार असा त्यांचा विश्वास आहे.या येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यासारख्या अल्पसंख्याक  कार्यकर्ताच्या मागे  कागलला येऊन हे मोठे नेते मंडळी का लागलेत असा सवाल करून मुश्रीफसो यांनी आपल्या नवीन स्टाईलने "पवार साहबसे मेरा बैर नहीं,पर समरजित अब तुम्हारी खैर नहीं,असा टोला मारला.तर समरजित घाटगे यांनी पदे भोगताना जात आठवली नाही का.? असा सवाल करून दोन्ही बाजुने एकमेकावर शाब्दीक फैरी झाडत आहे.पण या दोघांच्या लढ़तीत तिसराच आधी पासूनच तयारी केलेला उत्सुक नवीन चेहरा बाजी मारण्याची शक्यता असल्याची काही जाणकारांच्यात चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post