प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथील निशा नवनाथ खेडकर (वय 42) यानी शनिवार दि.21/09/2024 रोजी सकाळी आठच्या सुमारास विषारी औषध सेवन केल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी साळवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा दहाच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत निशा ह्या मांडुकली येथे कुंटुबिया समवेत रहात असून त्या सतत आजारी असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.त्याचे पती साखर कारखान्यात नोकरीस असून ते डुटीवर गेले होते.आज सकाळी सततच्या आजाराला कंटाळुन घरी कुणी नसल्याचे पाहुन त्यानी विषारी औषध सेवन केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पती आणि एक मुलगी आहे.