परप्रांतीय इसमा कडुन चार किलो गांजा जप्त.

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -जयसिंगपूर ते सांगली मार्गावरील असलेल्या हॉटेल आदित्य गार्डन येथे गांजा विक्री साठी आलेला परप्रांतिय नवाज अब्दुलगणी मुल्ला (वय 24.रा.ढ़ोर गल्ली दर्गा जवळ,मिरज ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याच्या कडील 88 हजार रुपये किमंतीचा चार किलो गांजा जप्त करून त्याच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात एमपीडीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी गणेशोत्सव काळात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसाय ,अंमली पदार्थांचा साठा करून विक्री करीत असलेल्यांच्यावर माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.त्या अनुशंगाने तपास करीत असताना जयसिंपूर ते सांगली मार्गावरील असलेल्या हॉटेल आदित्य गार्डन जवळ एक परप्रांतिय इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्याची खात्री करून बुधवार (दि.11) रोजी त्या परिसरात सापळा रचून  त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील असलेल्या प्लास्टिक पिशवीची झडती घेतली असता त्यात गांजा मिळून आला.त्या पिशवीत एकूण 88 हजार रुपये किमंतीचा चार किलो गांजा आणि मोबाईल जप्त करून त्याच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात एमपीडीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलिस अशोक पवार,अमित सर्जे,संजय कुंभार ,शुभम संकपाळ,राजू येडगे,सागर माने  आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post