प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हुपरी येथे वाळवेकर परिसरातील ब्रम्हंनाथ सुकुमार हालुंडे (वय 31 .सध्या रा.सिल्व्हर झोन C '13 ,फाइव्ह स्टार एमआयडीसी) याचा सोमवार दि.23/09/2024 रोजी मध्य रात्री 1 ते 5 च्या सुमारास अनोळखी इसमाने धारदार शस्त्रांने त्याच्या पोटावर ,छातीवर ,हातावर आणि मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला . घटना स्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,सुजित क्षीरसागर,गोकुळशिरगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड व हणमंतराव बदोले यांनी भेट दिली.या घटनेची नोंद गोकुळशिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत हा अविवाहित असून आपल्या आई वडीलांसह सिल्व्हर झोन येथे रहात आहे.तो स्वतःच चांडी व्यावसायिक आहे.तर त्याचा लहान भावाने आंतरजातिय विवाह केला असून तो पत्नी समवेत रेंदाळ येथे रहात असून हुपरी येथे दुसरीकडे कामास असल्याची माहिती मिळाली आहे.मयत याचे आई वडील गेल्या दोन चार दिवसापासून कर्नाटकातील जैनवाडी येथे शेंगा काढ़ण्यासाठी गेले होते.ते परत आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने ते काही वेळ बाहेरच थांबले .त्या नंतर दरवाजा उघडून आत प्रवेश करताच ब्रम्हनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी दोघां संशयीताना ताब्यात घेतल्याचे समजते.