मद्यपी तरुणांची पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी. कळंबा साई मंदिर येथील प्रकार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : बुधवारी रात्री अकराच्या सुमारास  कळंबा रोड वरील साईमंदिर येथे भररस्त्यात उभे राहून शिवीगाळ, दगड मारण्याची धमकी देणाऱ्या चौघा तरुणांना ताब्यात घेण्यासाठी आपत्कालीन पथकातील पोलीस गेले होते. यावेळी पोलीसांनाच दमदाटी करून त्यांच्याशी  हुज्जत घालून गैरवर्तन करणाऱ्या चौघा तरुणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कळंबा रोडवरील  साई मंदिर परिसरात चार तरुण दारू पिऊन लोकांना शिवीगाळ करत असून  मोठ मोठ्याने ओरडत असल्याची  माहिती तेथील नागरिकांनी ११२ या आपत्कालीन टोल फ्री नंबरवर दिली असता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर मनोहर रसाळ, सहायक फौजदार प्रदीप नाकील, दोघे होमगार्ड जवान असे चौघेजण घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी दंगा घालणाऱ्या चौघा तरुणांना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी अटकाव  करून पोलीसांशी हुज्जत घातली. अरेरावीची भाषा वापरत पोलीस कर्तव्यात अडथळा निर्माण केला. पोलीसांच्या हाताला हिसडा मारून पळून जाऊ लागले. यावेळी पोलीसांनी अक्षय मांगले, नागेश पाटोळे (रा. राजेंद्रनगर) या दोघांना अटक केली.

----------------------------------------

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा.

कोल्हापूर : एका  मुलीस फुस लावून तिच्याशी गोड बोलून तरुणाने तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर पिडीत मुलीस स्वत:च्या घरात दोन दिवस ठेवून लैगिक शोषण केल्या प्रकरणी पिडीतेच्या आईने राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी अजय अरुण पाटील (वय २६ रा.दौलतनगर) याला  अटक केली आहे.

पिडीत मुलगी शाळा शिकत असून तिची आई तांबे, पितळेची भांडी स्टॉल लावून विक्रीचा व्यवसाय  करते. संशयित अजय पाटील याने पिडीत मुलीशी ओळख  वाढ़वून  तिच्याशी गोड बोलून प्रेमाचे नाटक करून पिडीत मुलीचे नातेवाईक बाहेर गेल्याचे पाहून संशयिताने त्यांच्या  घरात प्रवेश करून  बंद घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पिडीत मुलीवर अत्याचार केला.हा प्रकार २०२२ ते सप्टेंबर २०२४ या दरम्यान  घडला. अजय पाटील याने पिडीत अल्पयवीन मुलीस आपल्या घरात ठेवूनही शोषण केले होते. पोलीसांनी पाटील यास अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दुरंदे करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post