प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे रहात असलेला अतिश अशोक माने (वय 26) यांचावर सोमवार (दि.10) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .
अधिक माहिती अशी की,अनंत रोटो कागल येथील वैभव शिवाजी कदम हा आणि जखमी अतिश माने कागल येथे एका बिअर बार दुकानात बिअर पित बसले होते.त्या वेळी त्यांच्यात झालेल्या वादातुन वैभव याने अतिशला तुला आता सोडत नाही म्हणुन शिवीगाळ करुन धक्का बुक्की केली.या वेळी वैभव याने रागाच्या भरात चाकूने अतिशच्या कमरेवर आणि हाताच्या मनगटावर हल्ला केला असता त्यात तो गंभीर जखमी झाला.ही घटना कागल येथे कमानी जवळ घडली असून जखमीला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटना स्थळी कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार व उपनिरीक्षक माधव डिंगोरे यांनी घटना जाऊन माहिती घेऊन आरोपी वैभव याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढ़ील तपास पोलिस उपनिरीक्षक डिंगोळे करीत आहेत.