भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करून 86 लाख 26 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - भरदिवसा ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरांना टार्गेट करून घरफोडी प्रकरणी विक्रम कित्तुरकर( रा.हालशी,बेळगाव) आणि महादेव नारायण धामणीकर (रा.हालशी ता खानापूर जि.बेळगाव) या दोघांना  स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून कोल्हापूर ,सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 13 घरफोडी आणि एक मोटारसायकल चोरीचे गुन्हें उघडकीस आणुन सोन्या-चांदीच्या दागिण्यासह 86  लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की ,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी सारख्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्हयांची पध्दतीची माहिती घेऊन ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरातील चोरीच्या प्रकरणात होत असलेली वाढ याचा एकत्रितपणे तपास सुरु केला असता  कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला गुन्हा हा बेळगाव येथील हालशी गावातील विक्रम कित्तुरकर याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली. सदरचा आरोपी हा चोरीतील दागिने विकण्यासाठी मुरगुड ते  सिध्दनेर्ली रोडवर असलेल्या रिध्दी सिध्दी मंगलकार्यालय जवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून दि.19/8/2024 रोजी विक्रम उर्फ राजू बाळू कित्तुरकर (वय 31.रा.इंदिरानगर हालशी,बेळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने  महादेव नारायण धामणीकर या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांच्याकडे एकत्रितपणे तपास केला असता महादेव धामणीकर हा सराईत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्या कर्नाटक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.हे दोघे जण कर्नाटकातुन एसटी बसने महाराष्ट्रात येऊन येथे मोटारसायकलची चोरी करून ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरांची टेहळणी करून त्या घरातील दागिण्यांची चोरी करून परत ते आपल्या गावी जात असत.आणि चोरीतील दागिने दोघांत वाटून घेत असत.यातील आरोपी विक्रम कित्तुरकर याने चोरीतील दागिने बेळगाव येथील फ़ेडरल बँकेत तर दुसरा आरोपी महादेव धामणीकर याने खानापूर (बेळगाव) येथे असलेल्या मुथुट फिनकॉर्प येथे हे दागिने गहाणवट ठेवून मिळणारी रक्कम घेऊन हे दोघे गोवा येथे मौजमजा केल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली.हे गहाणवट ठेवलेले दागिने जप्त करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे या वेळी सांगितले.या दोघां आरोपीनी गेल्या दोन महिन्यांपासून कोडोली येथे एक,चंदगड येथे दोन,मुरगूड येथे दोन,गडहिग्लज येथे दोन,भुदरगड ,आजरा व राधानगरी येथे एक आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एक असे तेरा गुन्हें पोलिस ठाण्यात दाखल असून 12 गुन्हे या पथकातील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.तसेच या प्रकरणात वापरलेली चोरीची मोटारसायकल खंडाळा (सातारा) येथे गुन्हा दाखल असून ती मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ह्या चोरीतील गुन्ह्यातील दागिण्याची 100% रिकव्हरी केली असून पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी या पथकाला 25 हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून भविष्यात अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.हे दोघे चोरटे चोरी करून चोरीतील दागिने  बँकेत गहाणवट ठेवण्याची शक्कल लढवत मिळणारी रक्कम घेऊन चैनी करत असत.या दोघांच्या शिवाय आणि कोण सामील आहे का त्या दृष्टीने तपास चालू असून त्यांनी दागिने  बँकेत गहाणवट देताना पुरावा म्हणून  कोणती कागदपत्रे सादर केली.त्याचीही माहिती या दोघांच्या कडुन घेत असल्याचे सांगितले.

या पथकातील पोलिसांनी एक किलो पेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि एक किलो पेक्षा जास्त चांदीचे दागिने आणि इतर असा एकूण 86 लाख 26 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.उपनिरीक्षक चेतन मसुटगे,तत्कालीन सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ,पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव,जालिंदर जाधव आणि शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post