प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिरोली येथे कोरगावकर कॉलनीत भाड्याने रहात असलेल्या सागर गोपाळ कोळवणकर (वय 35 .रा.न्हाव्यांची वाडी ,भुदरगड) याने मंगळवार (दि.03) रोजी पत्नी मनिषा सागर कोळवणकर (वय 31) हिच्या डोक्यात हातोडा मारुन गंभीर जखमी केल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार चालू असताना बुधवार दि.04/09/2024 रोजी पाचच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,हल्लेखोर पती सागर हा गेल्या दहा -बारा वर्षापासून पत्नी आणि दोन मुला सोबत रहात असून तो शिरोली एमआयडीसी येथे एका कंपनीत नोकरी करत होता.त्यांच्यात वाद झाल्याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारुन गंभीर जखमी केले होते.तिने आरडा ओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी हातोडा काढ़ुन घेऊन जखमी झालेल्या मनीषाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना दोन मुले असून एक नववीत आणि एक सहावीत शिकत असल्याचे समजते.सागर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे काहीनी पोलिसांना सांगितले.तेथील नागरिकांनी सागरला पकडून रुग्णवाहिकेतुन सीपीआर येथे आणुन तेथे असलेल्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.त्यालाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण तो तेथुन पसार झाल्याची माहिती मिळाली.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सागर गोपाळ कोळवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.