गणेश उत्सव आगमनावेळी काढ़लेल्या मिरवणूकीत साउंड सिस्टिमच्या दणदणाटात

 आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या तरुण मंडळावर कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -गणेशोत्सव काळात राजारामपुरी येथे गणेश आगमना वेळी काढ़ण्यात आलेल्या मिरवणूकीत साउंड सिस्टिमच्या दणदणाटांत आवाजाची पातळी ओलांडणारयां 31तरुण मंडळा बरोबर त्या मंडळाच्या अध्यक्षावर राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.कारवाई केलेल्या तरुण मंडळाच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याचा अहवाल तयार करून न्यायालयात सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.यात तरुण मंडळाच्या अध्यक्षासह डॉल्बीचे चालक मालक यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात येणार असल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती  दिली.

राजारामपुरीत असलेल्या मंडळानी ड्रॉ पध्दतीने काढ़ण्यात आलेल्या 54 मंडळानी मिरवणूकीत सहभाग दर्शविला होता.पण फक्त 36ंं मंडळच प्रत्यक्ष सहभागी झाले होते.18 मंडळानी मिरवणूकी भाग घेतला नसून 5 मंडळानी आपल्या मंडळाच्या आवारात साउंड लावून त्याच ठिकाणी मिरवणूक काढली.पोलिसांनी 36 मंडळाच्या साउंड सिस्टिमच्या आवाजाचे नमुने घेऊन 31 मंडळानी आवाजाची मर्यादा ओलंडल्याचे समोर आले आहे.या कारवाई केलेल्यात टेंबलाईवाडी येथील काही मंडळे,राजारामपुरीसह 31 मंडळाचा यात समावेश आहे.

तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांनी पाच मंडळावर तर शाहुपुरी पोलिसांनी  नऊ आणि राजवाडा पोलिसांनी सहा मंडळावर कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post