याचा तपास मपोका.व्ही.डी.महाडिक व पोलिस घस्ते करीत आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हुपरी येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या कोरवी गल्लीतील सुमन दिलीप कोरवी (वय 45) यांचा शुक्रवार दि.20 रोजी दुपारी दोनच्या सुमारास गिरीबुवा मळा येथे असलेल्या पडक्या विहीरीत पडल्याने तेथील नागरिकांनी बाहेर काढ़ुन उपचारासाठी हुपरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला असता तेथेच त्यांचा उपचारापूर्वी साडेतीनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात
झाली आहे.पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला..
अधिक माहिती अशी की यातील मयत सुमन दुपारी एकच्या सुमारास जळण गोळा करण्यासाठी गिरीबुवा मळा नाव्याच्या पडक्या विहिरीतील गारवेल काढ़ण्यासाठी गेल्या होत्या.ते काढ़त असताना अचानक त्यांचा पाय घसरून विहीरीत पडल्या .हा प्रकार तेथील वाटसरूच्या निदर्शनास आला असता त्यानी विहीरीत उडी मारून त्या महिलेला विहीरी बाहेर काढ़ुन त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली असता नातेवाईकांनी सुमन यांना बेशुध्दावस्थेत हुपरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्याच्या पश्च्यात पती आहेत.