प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - तारदाळ येथील पती पत्नी मोटारसायकल वरुन जोतिबा देवदर्शनासाठी गेले होते.परत येताना पंचगंगा घाटा जवळ असलेल्या गायकवाड यांच्या बंगल्याजवळ आले असताना त्यांच्या मोटारसायकलवर अचानक झाडाची फांदी पडल्याने यात सुनिल दत्तात्रय बुचडे ( वय 49)व पोर्णिमा सुनिल बुचडे (वय 42) हे पती पत्नी जखमी झाले.हा प्रकार मंगळवार( दि.03 ) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडला.जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
---------------------------------------
ट्रकच्या धडकेत एक जखमी.
कोल्हापूर - मार्केटयार्ड येथे रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकची धडक लागून झालेल्या अपघातात बबन केराप्पा भडकुंबे (वय 65) हे जखमी झाले.हा प्रकार मंगळवार (दि.03) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला.त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
लाकूड कापताना तरुण जखमी.
कोल्हापूर - गगनबावडा परिसरातील पडवळवाडी येथील विलास भिकाजी म्हेतर (वय 49) हे कटर मशीनच्या सहाय्याने लाकूड कापत असताना त्यांच्या पायाला लागून त्यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .हा प्रकार सोमवारी (दि.02) रोजी सायंकाळी घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
अपघातात दोघे जखमी.
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात मिथुन भिमसेन चव्हाण (वय 35)आणि अभिजीत कृष्णात वडेकर(वय 26) हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
मारहाणीत एक जखमी.
कोल्हापूर - शहाजी वसाहतीत रहात असलेले गौरव दत्तात्रय पाटील (वय 26.रा.मुळ गाव यवलुज) यांना किरकोळ कारणातुन झालेल्या मारहाणीत जखमी झाले आहेत.हा प्रकार सोमवारी (दि.02) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडला असून जखमीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.