प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला आणि अन्य गुन्ह्यातील संशयीत आरोपी जर्मन गँगचा सदस्य सुरज साताप्पा पाटील (रा. खेबवडे, ता.कागल, जिल्हा कोल्हापूर )हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने पोलीसांना मिळून येत नव्हता. तो गुरूवारी कळंबा नाका येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अण्वेशनच्या पथकास मिळाली असता् स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.
सुरज पाटील याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार गजानन गुरव, परशुराम गुजरे, संतोष बरगे, वैभव पाटील, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे तपास पथक नेमले. संशयीताचा शोध घेत असताना तो दि. २६ सप्टेंबर रोजी कळंबा नाका येथील एका हॉटेलमध्ये येणार असलयाची माहिती गोपणीय बातमीदाराकडून मिळाली असता पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने आपले नाव सुरज साताप्पा पाटील असे सांगीतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली. त्यामुळे पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासासाठी शिवाजी नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले तसेच त्या गुन्हामध्ये त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली..