प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - करवीर तालुक्यातील घोटवडे येथील प्रमिक्षा राजेंद्र पाटील (वय 27) या विवाहित महिलेने शुक्रवार दि.13/09/2024 रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास रहात असलेल्या घोटवडे येथील घरात छताला लोखंडी पाईपला साडीने गळफास लावून घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी साडेपाच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत प्रमिक्षा हिचे मांडुकली येथील तरुणाशी तीन चार महिन्या पूर्वी विवाह झाला होता.ती गणपती सणा निमित्त माहेरी आली होती.
--------------------------------------
रोड अपघातात जखमीचा मृत्यु.
कोल्हापूर -राजारामपुरी येथे पायमल वसाहत परिसरात रहात असलेल्या जोतिबा विष्णु चव्हाण (वय 53) यांचा सोमवार दि.09/09/2024 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास मनोरमा हॉस्पिटलच्या समोर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम मंगळवार पेठेतील KCP रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारास मंगळवार (दि.10) रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना शुक्रवार (दि.13) रोजी दुपारी एकच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
शॉक लागून एकाचा मृत्यु.
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील आंबेवाडी सवळेकरी गल्लीतील सुनिल रंगराव पाटील (वय 56) यांचा शुक्रवार दि.13/09/2024 रोजी सकाळी नऊच्या सुमारास रहात असलेल्या घरावर लोखंडी पट्टयावर गवताच्या पेंढ़या ठेवत असताना अचानक शॉक लागून छपरावरुन खाली पडुन जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी सव्वा दहाच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------