सीपीआर रुग्णालयात दाखल केलेल्या वृध्दाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - शनिवार पेठेतील किरण लॉज परिसरात रहात असलेला मारुती ज्ञानदेव पाटील  (वय 62 रा.1464 सी वॉर्ड) ह्यांना गुरुवार (दि.29) रोजी साडे अकराच्या सुमारास लक्ष्मीपुरीतील शाहु लॉज येथे चक्कर आल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना शुक्रवार दि.06/09/2024 रोजी सकाळी नऊच्या सुमारास मृत्यु झाला.सदर मयताचे नातेवाईक त्यांना सोडून गेल्याने त्यांना मोबाईलवर फ़ोन केल्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृतदेह सावित्रीबाई फुले रुग्णालयात शिफ्ट केल्याची येथील डॉक्टरांनी वर्दी कळविली आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

  उपोषणास बसलेल्या शिक्षकेला चक्कर आल्याने उपचारास दाखल.

कोल्हापूर - जिल्हा परिषद येथे उपोषणास बसलेल्या रिटायर शिक्षिका सरिता चंद्रकांत शिरढ़ोणे (वय 58.रा .सांगरुळ फाटा ,कोपार्डे) या गुरुवार (दि.05)रोजी या उपोषणास बसल्या होत्या.त्यांना शनिवार(दि.07) रोजी सकाळी नऊच्या सुमारास अचानक चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

  गणेश मिरवणूकीत कोल्ड़ फायर फुटुन तरुण भाजून जखमी .

कोल्हापूर - आज गणेश चतुर्थी निमीत्त गणेश मुर्ती आणत असताना निघालेल्या मिरवणूकीत खानविलकर पेट्रोल पंप परिसरात मिरवणूक आली असता अचानक कोल्ड़ टायर फुटल्याने सोहेल मुबारक शेख (वय 29.रा जवाहरनगर,को.) हा भाजून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .हा प्रकार शनिवार (दिं.07)रोजी एक च्या सुमारास घडला असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

कुत्रे आडवे आल्याने दुचाकीस्वार जखमी.

कोल्हापूर - दुचाकीवरुन जात असताना विद्यापीठ परिसरात असलेल्या निसर्ग उद्यान जवळ अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकी वरुन पडून जखमी झाल्याने वैभव वसंत जवंदाळे (वय 32.रा.वडणगे) याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .ही घटना शनिवार (दि.07) रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post