प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - सदरबाजार येथील बनुबाई यमनाप्पा कांबळे (वय 80) यांना गुरुवार दि.19/09/2024 रोजी सकाळी अकराच्या सुमारास शाहु कॉलेज समोर विचारेमाळ परिसरात असलेल्या मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या देवदर्शन घेऊन थोडा वेळ तेथील पायरीवर बसल्या असताना समोरुन येणाऱ्या कारने त्यांना उडविल्याने त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना
त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी डी.वाय .पाटील येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना दीडच्या सुमारास मृत्यु झाला असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला. या अपघाताची नोंद शाहुपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
या अपघातातील कार कांरडे मळा येथे रहात असलेल्या पीटर नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्या कार चालकाच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.