गट क्रमांक दोन या गटाची आंतरवासिता राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु.) येथे पार पडली.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव येथे बीएड द्वितीय वर्ष  अंतर्गत आंतरवासिता टप्पा क्रमांक-२  या प्रात्यक्षिकांतर्गत आंतरवासिता गट क्रमांक दोन या गटाची आंतरवासिता राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु.) येथे पार पडली. 

या आंतरवासितेमध्ये १५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत छात्राध्यापकांनी अध्ययन-अध्यापनाबरोबरच शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले. यामध्ये विविध स्पर्धा  राबविण्यात आल्या. आंतरवासितेदरम्यान सर्व येणारे उपक्रम व सण- उत्सव शाळेमध्ये राबविण्यात आले. निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, हिंदी निबंध स्पर्धा, पाककला स्पर्धा, इंग्रजी शब्द पाठांतर,  पाढे पाठांतर, क्रीडा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच कृतीयुक्त विविध ऍक्टिव्हिटी इंग्रजी शब्द ऍक्टिव्हिटी, वृक्षारोपण, रानभाज्या रेसिपी, झिम्मा फुगडी, श्रावणी सहल, राख्या बनविणे, शिक्षक दिन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. शुक्रवार दिं. 13/09/2024 रोजी अंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला .


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल.मॅडम (कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव) तसेच अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. एस. पाटील सर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेमधील सर्व शिक्षक स्टाफ, मार्गदर्शक प्राध्यापिका शिरतोडे मॅडम व डॉ.पवार मॅडम, सर्व छात्राध्यापक, तेथील शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी सर्वजण उपस्थित होते. छात्राध्यापकांनी केलेल्या सांगता समारंभाच्या नियोजनामध्ये सूत्रसंचालन सुनंदा पवार या छात्राध्यापिकेने केले. शाळेसाठी आवश्यक व उपयोगी सरस्वती मूर्ती भेट देऊन त्याच प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक शर्वरी करपे, पाहुण्यांचा परिचय रोहिणी बंडगर व पाहुण्यांचे स्वागत अश्विनी डबके यांनी केले. पूर्ण आंतरवासिता कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये गुणांकन प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.


 प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनिता कोंडेकर ,श्रद्धा महाले व सुरेश चौगुले या छात्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर  मार्गदर्शिका शिरतोडे मॅडम व पवार मॅडम यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले व शाळेचे आभार मानले. प्रमुख पाहुण्या प्राचार्या डॉ. निर्मळे मॅडम यांनी छात्र अध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच भविष्य काळासाठी शुभेच्छा देऊन शाळेतील विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या व शाळेचेही आभार मानले. अध्यक्षीय भाषणात एस. एस. पाटील सरांनी सर्व छात्राध्यापकांचे कौतुक केले व त्यांना भावी शिक्षक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला . कार्यक्रमाचे आभार दिपाली जाधव यांनी मांडले. अशाप्रकारे अंतरवासिता गट क्रमांक दोनचा सांगता समारंभ संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post