प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -गोकुळशिरगाव येथील हॉटेल हरिप्रसाद येथे शनिवार (दि.21) रोजी एक अनोळखी इसम (वय अंदाजे 55) बेशुध्दावस्थेत आढ़ळल्याने त्याला उपचारासाठी 108 या रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे बुधवार दि.25 रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
अपघातातील जखमीचा मृत्यु.
कोल्हापूर -करवीर तालुक्यातील पाचगाव येथे रहात असलेले चंद्रकांत अनंत करंबेळकर (वय 52.रा.शिक्षक कॉलनी,पाचगाव कोल्हापूर) यांचा गुरुवार (दि.19) रोजी चारच्या सुमारास कुरळप ते इस्लामपूर मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम कुरळप येथील पोरवाल हॉस्पिटल येथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी शनिवार (दि.21) रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना बुधवार (दि.25) रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.