प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील सोनाळी येथील गुरव गल्लीतील रामचंद्र विठोबा मोरे (वय 55) यांचा मंगळवार दि.17/09/2024 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बापू गणू पाटील यांच्या शेतात असलेल्या विहीरीत पाय घसरून पडून बुडाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी विहीरीतुन बाहेर काढ़ुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी बाराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की , रामचंद्र मोरे हे रोज सकाळी शेळ्या घेऊन चारण्यासाठी शेतात जात असत आजही ते नेहमी प्रमाणे सकाळी सातच्या सुमारास शेळ्या घेऊन शेतात गेले होते.बराच वेळ झाल्याने ते घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध चालू केली आहे हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.