प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल येथे कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते समरजित घाटगे हे भाजपला राम राम देत मंगळवार(03) रोजी गैबी चौक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेंस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेणार आहेत.या निमीत्ताने पक्षाध्यक्ष मा.शरदरावजी पवार समरजित घाटगेना आपल्या भाषणात कोणती उपमा देणार याकडे कार्यकर्त्यासह कागल वासीयांत उत्सुकता लागून राहिली आहे.
या निमीत्ताने 20 ते 25 वर्षापूर्वीची घटना ताजी होत आहे.कागल येथे गैबी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यावेळी मा.शरदरावजी पवार यांनी आपल्या भाषणात एका गुरुच्या शिष्याला बाल हनुमान ही उपमा दिली होती.या बाल हनुमानाने आज प्रर्यत मोठी झेप घेऊन आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसात आदर निर्माण केला आहे.त्यांना शह देण्यासाठी ही चाल यशस्वी होईल का यात येणारा काळच ठरवेल.
या कार्यक्रमाला इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.यांच्या स्वागतासाठी चौका चौकात कमानी स्वागत कमानी आणि फलक लावलेले आहेत.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि येणारी विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने खा.शरदरावजी पवार यांची कागलात ही प्रथमच सभा होत असून समरजित घाटगे यांच्या प्रवेशाने कार्यकर्त्यात मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
.