प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील भादोले येथील सौ. अनुराधा ऋर्षीकेश मदने (वय 20) हिने मंगळवार (दि.17) रोजी सातच्या सुमारास रहात असलेल्या घरात छताच्या हुकास नॉयलॉन दोरीने गळ्यास गळफास लावून घेतलेल्या स्थितीत मिळुन आल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता साडे बाराच्या मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत नवविवाहितेचे माहेर तासगाव तालुक्यातील मतकुणकी गावची असून तिचे लग्न भादोले येथील ऋषीकेश मदने यांच्याशी सहा महिन्यापूर्वी झाले होते.ती तीन ते चार महिन्याची प्रेगन्ट असून तिला सासरच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता असल्याची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिली.याची फिर्याद संपत जाधव यांनी पेठगाव पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पती,सासू सासरा यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात काम चालू होते.याचा तपास पोसई पाटील,सहा.फौ.सिंघण आणि म.पो.आढ़ाव हे करीत आहेत.