तलवार घेऊन दहशत माजविल्या प्रकरणी एकाला अटक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - विक्रमनगर येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत माजवून आरडाओरडा करत असलेला सचिन शिवाजी आगलावे (वय 26.रा.विक्रमनगर ) याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.याची फिर्याद राजाराम विष्णु पाटील (पोलिस नाईक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली.

अधिक माहिती अशी की ,विक्रमनगरातील श्री स्वामी समर्थ मंदीर जवळ शनिवार(दि.14) रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास सचिन आगलावे हा हातात तलवार घेऊन दहशत माजवून सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरडा करीत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी घटना स्थळी जाऊन त्याच्या हातातील तलवार जप्त करून त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर विवीध कलमानुसार  राजारामपुरी ,शाहुपुरी आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post