प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिये येथील गावभाग परिसरात असलेल्या पाटील गल्लीतील रमेश दिलीप फडतारे (वय 35) याने गुरुवार दि.19/09/2024 रोजी सायंकाळी पावणे नऊच्या सुमारास रहात असलेल्या घरात पंख्याच्या हुकास दोरीच्या सहाय्याने गळ्यास गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून त्याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी रात्री दहाच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,रमेश फडतारे हा गावातच त्याच्या नातेवाईकांचे सलूनचे दुकान असून त्यांच्याकडे कामास होता.त्याच्या पश्च्यात पत्नी,दोन लहान मुली आणि आई वडील आहेत.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.