कोल्हापुर पोलिस अधीक्षक कार्यालयात आढ़ावा बैठकीत उल्लेखनीय कामगिरी केल्या प्रकरणी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात आढ़ावा बैठक घेण्यात आली.याचे औचित्य साधून गणेशोत्सव काळात योग्य पध्दतीने नियोजन करून चोख बंदोबस्त ठेवण्यात येऊन शांततेत पार पाडुन आपल्या कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या त्याच्या कामाची पोच पावती म्हणुन पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


येणारा नवरात्र उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्या संदर्भात बैठका घेऊन पहाणी करून रुट मार्च घेण्यावर या आढ़ावा बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.तसेच प्रलंबीत असलेले गुन्हे याची तात्काळ तपास करून  मार्गी लावण्याचे आवाहन या वेळी केले.112 हा टोल फ्री नंबर डायल केल्यावर पोलिस तात्काळ पोहचण्यास कोल्हापूर पोलिस आघाडीवर आहेत.फक्त सहा मिनीट आणि 19 सेकंदात घटना स्थळी पोहचल्याने  संबंधित व्यक्तीला मदत मिळाली.या कामगिरीमुळे त्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.सीपीआर रुग्णालयात केसपेपर काढ़ण्यासाठी आलेल्या महिलेला चक्कर आल्याने तिला तात्काळ स्ट्रेचरची किंवा वॉर्डबॉयची वाट न पाहता स्वतः उचलून अपघात विभागात दाखल करून डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्यामुळे सदर महिलेचा जीव वाचल्यामुळे त्यांना मदत केलेले लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हेड कॉ.सुधीर हेगडे पाटील यांचाही पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या आढ़ावा बैठकीत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,यांच्यासह कोल्हापुर जिल्हयातील अप्पर पोलिस अधीक्षक ,पोलिस उपअधीक्षक,निरिक्षक आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post