पुणे न्यूज एक्सप्रेस :
पैगंबर जयंती निमित्त बहुजन समन्वय समितीतर्फे शांती कॉन्फरन्सचे मिरज येथील कच्छी हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.बहुजन समन्वय समितीचे महापालिका क्षेत्र अध्यक्ष शिवाजी त्रिमुखे याने प्रस्तावना मध्ये प्रत्येक गावागावात शिव,फुले शाहू, आंबेडकर दंगल मुक्त गाव अभियान शासनाने सुरू करावे जेणेकरून गावामध्ये शांतता निर्माण होईल.शिरोळ तालुक्यातील चिपरी या गावांमध्ये ग्रामसभेत दंगल मुक्त गाव अभियान समिती तयार करण्याचा चा करण्याचा ठराव पास करण्यात आला तसेच आमदार डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांनी ही माननीय मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे दंगलमुक्त गाव राबवण्या संदर्भात निवेदन दिले आहे. याबद्दल ग्राम पंचायत सरपंच चिपरी, सदस्य, ग्रामस्थ व आमदार यड्रावकर यांचा अभिनंदनचा ठराव शांती कॉन्फरन्सच्या वतीने मांडण्यात आला.
मौलाना मुख्तार अशरफ पुढे म्हणाले की पैगंबराचे जीवन चरित्र हे समजून घेणे गरजेचे आहे पैगंबर साहेबांनी गुलाम पद्धत,महिलांचे शोषण,सावकारी,दारूबंदी,अस्पृश्यता, जातिव्यवस्था इत्यादी प्रथा बंद करून समाजवादी अन्याय मुक्त समाज निर्माण केला त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही समाजवादी विचार समाजामध्ये निर्माण केला.
या शांती कॉन्फरन्स करिता सी.आर. सांगलीकर,तानाजी सातपुते, नितीन कांबळे,महादेव बानगुडे रेव्ह सावंत माने,जैलाबदीन शेख,शाकीर तांबोळी,मौलाना इजाज कादरी,सोहेल चौधरी,मौलाना रफिक मोमीन,मुबारक फरास,मेहबूबाली मनेर,हिदायत कादरी प्राध्यापक प्रज्योत ढाले आधी उपस्थित होते आभार भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशिक कांबळे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुफ्ती शरीफ साबरी हे होते. या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम,दलित समाजासह विविध जाती धर्मातील पंथातील लोकांची आवर्जून उपस्थित होते