-- इचलकरंजी येथे 'छडी लागे छम छम' कथासंग्राहचे प्रकाशन ; नामांकित साहित्यिक कवींची उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : लिहिणारे वाढताहेत हे आशादायक चित्र असले तरी वाचणारे घटताहेत ही शोकांतिका आहे. असे विचार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक भीमराव धुळूबुळू यांनी सचिन कोरोचीकर यांच्या 'छडी लागे छम छम 'या कथासंग्राहाच्या प्रसंगी व्यक्त केले.
इचलकरंजी येथे रोटरी क्लब सभागृहात साहित्यिक कवी सचिन कोरोचीकर यांच्या छडी लागे छम छम या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.साहित्यिक डॉ उमेश कळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भीमराव धुळूबुळू म्हणाले, एक शिक्षक लिहतोय ही आनंदाची गोष्ट आहे. लिहिणारा शिक्षक हा चिन्तनशील असतो त्यामुळे समाजातील व्यथा, वेदना, प्रश्न, गरजा त्याला समजतात. कोरोचीकर यांना लिहिण्याची हातोटी मिळाली आहे. त्यांच्याकडून आणखी दर्जेदार लेखन होईल. नव्या पिढीतील कवी , साहित्यिकांनी चौफेर लेखन करावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी मनोगतातून साहित्य निर्मिती आणि वास्तव याविषयी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमास मसाप अध्यक्ष वैशालीताई नाईकवडे , मार्गदर्शक प्राचार्य प्रशांत कांबळे ,चित्रकार विजय मगदूम, सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने, संजय मरडी, बसगोंड कबाडे, रमेश हेगाणा , श्रेयस शिरोळकर,
अशोक कांबळे, मनोज रणदिवे, शैला कोरोचीकर, डॉ अमर कांबळे, डॉ प्रशांतकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रकाशक विजय जगताप यांनी स्वागत केले. संजय कांबळे यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. राजेंद्र प्रधान यांनी सूत्रसन्चलन केले.