प्रेस मीडिया लाईव्ह :
अर्जुन धुमाळे :
इचलकरंजी : गणेशोत्सव काळात शिक्षक यांना ऑर्डर देऊ नयेत, शिक्षक यांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत तसेच कमी पडलेली मोफत पाठपुस्तके त्वरित द्यावीत .या मागणीसाठी आज इचलकरंजी महानगरपालिका मध्ये मा. उपायुक्त सौ स्मृती पाटील मॅडम व प्रशासनअधिकारी श्री इरफान पटेल सर यांना खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचलकरंजी व शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने आज दिनांक 2/9/2024रोजी निवेदन देण्यात आली. यावेळी उप आयुक्त मॅडम व प्रशासनअधिकारी यांनी वरील निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याची खात्री आम्हाला देण्यात आली.
या वेळी खाजगी प्राथमिक शिक्षक समिती इचलकरंजी चे अध्यक्ष श्री प्रशांत गुरव, कार्याध्यक्ष श्री सचिन वारे, सौ शितल खानाज मॅडम, सौ खांडेकर मॅडम, सौ गवळी मॅडम, सौ निशा सूर्यवंशी, सौ परदेशी मॅडम तसेच श्री. बी एस. पाटील , श्री प्रदीप पाटील, श्री सागर शेंडे श्री किरण कोळी, श्री अर्जुन धुमाळे, श्री संकपाळ सर, श्री कारंडे सर, श्री आनंदा कांबळे व शैक्षणिक व्यासपीठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.