प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१६ भारतीय राजकारणामध्ये गेली पन्नास वर्षे सातत्याने कार्यरत राहिलेले कॉ.सिताराम येचुरी हे साधेपणा ,सखोल विद्वत्ता, सुबोध मांडणी,अविचल तत्त्वनिष्ठा आणि प्रबोधनावर विश्वास असणारे एक प्रभावी नेतृत्व होते. अजून काही वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाची व नेतृत्वाची या देशाला मोठी गरज होती. त्यांच्या निधनाने पुरोगामी व परिवर्तनवादी राजकीय पक्ष ,संस्था - संघटनांची फार मोठी राष्ट्रीय हानी झालेली आहे.वर्तमान राष्ट्रीय राजकारणात कालवश कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी घेतलेली दिशा व दाखवलेला मार्ग योग्य आहे.
माफिया भांडवलशाही आणि अतिरेकी धर्मांधता यांचे साटेलोटे असलेल्या आजच्या राजकीय, सामाजिक ,आर्थिक व सांस्कृतिक वास्तवाचं भान व आव्हान समजून घेतले पाहिजे. कष्टकरी ,कामगार, सर्वहारा वर्गाची गळचेपी करणारी धोरणे आखली जात त्याला कडाडून विरोध करण्यासाठी देश,राज्य,जिल्हा, तालुका या सर्व पातळीवर एकजुटीने काम केले पाहिजे. तीच कॉम्रेड सीताराम येचुरी आदरांजली ठरेल ,असे मत समाजवादी प्रबोधिनी येथे माकपचे महासचिव कॉ.सिताराम येचुरी यांच्या आदरांजली सभेत व्यक्त करण्यात आले. या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानी समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे होते. प्रारंभी कालवश कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि स्तब्धता पाळून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या आदरांजली सभेत असे मत व्यक्त करण्यात आले की,भारतीय राजकारणात आज उभी राहिलेली इंडिया आघाडी असो, अथवा यापूर्वी एच.डी देवेगौडा ,इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आदींची सरकारे असोत ती बनवण्यामध्ये सिताराम येचुरी यांचा मोठा सहभाग होता. विद्यार्थी दशेपासून अखेरपर्यंत त्यांनी देश घडवण्यासाठी दिलेले योगदान अतिशय स्पृहणीय व अनुकरणीय स्वरूपाचे होते. एक उत्तम नेता, एक उत्तम संसदपटू आणि सर्वांना आदरणीय असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. या आदरांजली सभेत सर्व वक्त्यांनी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत ,आठवणींना उजाळा देत आदरांजलीपर मनोगते व्यक्त केली.
यावेळी मदन कारंडे ( राष्ट्रवादी शरद पवार गट),जयकुमार कोले (स्वाभिमानी शेतकरी संघटना - पक्ष),अजित मिणेकर ( काँग्रेस व भटक्या विमुक्त संघटना),सयाजी चव्हाण (शिवसेना उध्दव ठाकरे गट),प्रसाद कुलकर्णी( समाजवादी प्रबोधिनी ),अहमद मुजावर (ताराराणी पक्ष) , चंद्रकांत पाटील ( पॉवरलुम असोसिएशन) ,वसंत कोरवी ( आम आदमी पक्ष),शिवगोंडा खोत (कॉ.के.एल.मलाबादे गृहनिर्माण संस्था व पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटना),आनंदा गुरव (आयटक ) , हणमंत लोहार (भाकप ),शिवाजी साळुंखे ( शेकाप),प्राचार्य ए. बी. पाटील ( विविध कामगार संघटना),भरमा कांबळे,( माकप)दत्ता माने ( लाल बावटा कामगार युनियन) ,पार्वती जाधव( महीला संघटना),रामदास कोळी,शिवाजी शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रा. डॉ. एफ.एम.पटेल, नौशाद शेडबाळे,शिवगोंडा खोत, आनंद चव्हाण , सुरेश चौगुले,रसूल नवाब, दत्तात्रय रावळ, भाऊसाहेब कसबे, जीवन कोळी,कुमार कागले, उषा माळी, सूर्यकांत शेंडे, नबी शहापुरे दगडू शिंगारे,प्रवीण डावकर, श्रीकांत माळी, रामदास डोईफोडे, किसन सोनगेकर, अशपाक गाडीवाले,बाळासाहेब माने, नूरमोहम्मद बळकुडे , भरत सुतार ,धनाजी जाधव ,लतीफ फकीर, गोपाळ पोला ,सुभाष कांबळे, विठ्ठल कांबळे, रामचंद्र सौंदत्ते, बाबू शिंदे,उत्तम चौधरी, आनंदा वाघमारे, तातोबा सुतार विजय कोरे, निवृत्ती गांथडे, दादासो कांबळे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.