प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
येथील कुडचे नगर परिसरातील जय शिवराय तरुण मंडळाने भगवान विष्णूंची विविध अवतारातील भव्य आकर्षक ९ फुटी गणेशमूर्ती साकारली आहे.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ही गणेशमूर्ती शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे .
कुडचे नगर परिसरातील जय शिवराय तरुण मंडळाची स्थापना २००५ साली झाली असून या मंडळाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला जातो.युवकांना संघटित करुन त्या संघटीत ताकदीचा वापर विधायक कार्यासाठी केला जातो.त्यामुळे या मंडळाचे हे वेगळेपण निश्चितच अनुकरणीय व प्रेरणादायी ठरले आहे.यंदाच्या वर्षी देखील या मंडळाने ९ फुटी भगवान विष्णूंची विविध अवतारातील भव्य गणेशमूर्ती साकारुन आकर्षक गणेशमूर्तीची परंपरा कायम ठेवली आहे.ही गणेशमूर्ती सांगवडे ( ता.करवीर ) येथील कारागीर वैभव कुंभार यांनी तयार केली आहे.भव्य व लक्ष वेधून घेणारी ही गणेशमूर्ती बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.