वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा सोमवारी वर्धापन दिन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. २० गेले अडीच दशक वृत्तपत्र पत्र लेखकांसाठी संघटितपणे काम करणाऱ्या वृत्तपत्र पत्रलेखक संघ ,इचलकरंजी या संघटनेच्या २७  व्या  वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र पत्रलेखकांचा जाहीर मेळावा आणि पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार निखिल पंडितराव हे मार्गदर्शन करणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे हे आहेत. यावेळी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेच्या सदस्या माधुरी कुंभीरकर यांच्या ' मत मतांतरे 'या वृत्तपत्र पत्रसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ता. २३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६  वाजता समाजवादी प्रबोधिनी येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व पत्रलेखक ,पत्रकार ,जिज्ञासू बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे आणि सर्व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post