प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२१ भारतीय संस्कृती, निरनिराळी तत्वज्ञाने ,राष्ट्रीय एकात्मता यासह भारतीय राज्यघटनेतील मूल्ये समाजामध्ये रुजवण्यासाठी समाजवादी प्रबोधिनी सातत्यपूर्ण रीतीने विविध प्रकारे जे काम करते आहे ते अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे.
समाजाचे वैचारिक पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे आणि त्यातून मानवतावादाची शिकवण देण्याचे काम येथे केले जाते. त्याचे वर्तमानकाळात फार मोठे महत्त्व आहे.तसेच प्रबोधन वाचनालयाच्या द्वारे वाचन संस्कृती विकसित करण्याचे होत असलेले काम अनुकरणीय आहे असे मत आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार विजेते ऍड. फैजल खान ( अध्यक्ष, खुदाई खिदमतगार संघटना, दिल्ली) यांनी व्यक्त केले.
ऍड.फैजल खान आणि निवृत पोलीस अधिकारी मा. विजय देशपांडे ( अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटना ,सातारा ) यांनी समाजवादी प्रबोधिनीला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.विजय देशपांडे यांनी प्रबोधिनीशी ऋणानुबंधाच्या जुन्या आठवणी सांगितल्या. प्रसाद कुलकर्णी यांनी या मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.यावेळी ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद्राचे अध्यक्ष नुरुद्दिन काझी,मुख्याध्यापक शहानूर कमालशाह , सलिम संजापुरे, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावीआदी उपस्थित होते.