ऑल इंडिया ह्यूमन राईट राईट असोसिएशन दिल्ली व विणकर संघटना यांच्या वतीने महानगरपालिका निवडणूक महिला लढविणार...

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इंचलकरंजी महानगरपालिकेकडून मिळत असलेल्या गैरसोयीबद्दल आज विनकर संघटना इंचलकरंजी येथे सुनील मेटे यांच्या अध्यक्षतेखाली व दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये इंचलकरंजी महानगरपालिका  झाल्यापासून नागरिकांना कुठलीही सुविधा मिळत नाही उलट संपूर्ण कर वाढवण्यात आलेला आहे तरी त्यासाठी एक ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन दिल्ली व विणकर संघटना यांच्या वतीने महिलांची मीटिंग केली होती महिलांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे 

महिलांच्या वतीने असे बोलण्यात आले की इंचलकरंजी महानगरपालिका ही महिलांच्या ताब्यात देण्यात यावी त्यासाठी आम्ही सर्व महिला प्रत्येक भागातून निवडणूक लढवायला तयार आहोत अशी महिलांची मागणी आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक भागात महिलेला निवडणुकीसाठी इंचलकरंजी प्रत्येक भागात निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करणार आहोत त्यासाठी कोणताही पक्षाची अपेक्षा न करता  ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन दिल्ली व विणकर संघटना यांच्या वतीने इचलकरंजीतील प्रत्येक भागात महिलांना इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यात येणार आहे 

त्यामुळे सदर बैठकीसाठी महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे व काही महिला महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार आहेत व ज्या महिलांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी आपल्याकडे नावे नोंदवावी  असे आवाहन ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर व विनकर संघटनेचे अध्यक्ष सुनील मेटे यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर बैठकीसाठी गीता कुरुंदवाडे ,ज्योती लाटणे, सुरेखा उगार ,रेखा नसीमा रड, दीपिका सुतार, राहुल लाटणे, श्रीनिवास फुलपाटे ,दीपक पेटकर,गीता सुतार, सुप्रिया मजले ,गीता माने ,सुवर्णा मांजरे आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post