त्रिवेणी त्रैभाषिक कवी संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२६ हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील त्रिवेणी त्रैभाषिक कवी संमेलन हिंदीतील ख्यातनाम कवी शारदेंदु शुक्ल ' शरद ' यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय बहारदारपणे संपन्न झाले. संमेलनात प्रसाद कुलकर्णी, इरफान शहाणूरी, गौरी पाटील, सागर बेळगावी, सुजित सौंदत्तीकर, मुकुल गोयंका ' व्याकुल' ,इब्राहिम फैज या मान्यवर कवींनी आपल्या अप्रतिम रचना सादर केल्या. या सर्व कवीने मानवी मनातील भावभावना आणि समाज जीवनातील आंदोलने यावर अतिशय प्रभावी पद्धतीने आपल्या कवितातून, गझलांतून भाष्य केले. प्रेमासारख्या तरल भावनेपासून राजकारणातील विकृततेपर्यंतचे विविध विषय या संमेलनात कवितेच्या माध्यमातून सादर झाले.रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह आणि महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कवी संमेलनाला रसिकांची भरभरून दाद मिळाली.

या कार्यक्रमाला इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी या मैफलीचा समारोप अतिशय आशय संपन्न असा केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान  शहानूरी यांनी केले, ज्यांनी आपल्या खास शैलीतून संपूर्ण संमेलनात रंग भरला. त्रिवेणी त्रैभाषिक कवी संमेलनाचे उद्दिष्ट साध्य होत तीन भाषांतील काव्यांचे एकत्रीकरण यशस्वीरीत्या झाले. रोटरीच्या श्री दगडूलाल मधला मानव सेवा केंद्रा त झालेल्या या कविसंमेलनास गणेश निकम,विवेक हजबे ,महसूल जमादार, मतीन शेख , गिरीष कुलकर्णी, संतोष साधले, संजय होगाडे, अशोक केसरकर, राजेंद्र मुठाणे, बजरंग लोणारी,किरण कटके , डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांच्यासह

इचलकरंजीतील साहित्य प्रेमी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post