दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड  अर्जुन धुमाळे :

दत्तवाड ता.शिरोळ येथे दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली. नूर कासीम काले (वय.49,रा.दत्तवाड)असे त्याचे नाव असून या गुंडाला बुधवारी रात्री पोलिसांनी अटक करून १ वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे.

      नूर कालेविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी सादर केला होता.

        दरम्यान झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) आणखीन दोन प्रस्ताव प्रस्तावित आहेत.त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धागे दणाणले आहेत.

         दतवाड येथील नूर काले याची मोठी दहशत होती गर्दीत मारामारी,विनयभंग, जुगार यासह अवैद्य व्यवसायाची पंढरी तसेच पांढरी शर्ट घालणारे मंत्री यांचे त्यांना मोठे वरदहस्त  निर्माण झाले होते. त्याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. कुरुंदवाड पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचीही यापूर्वी कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करत कारवाईचा दणका दिला आहे.

      साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी यापूर्वी चव्हाण खून प्रकरणी सागर पवार गॅंग विरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवून मोक्याची कारवाई केली होती. गणेशोत्सवाच्या काळात दहा जणांच्या विरुद्ध हद्दपारीची ही कारवाई केली आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) दोन प्रस्ताव प्रस्तावित आहेत. तर चार जणांचे हद्दपरीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. वर्षभरातील ही दुसरी मोठी कारवाई  सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केल्याने पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये त्यांची कौतुक होत आहे व कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिक आणि गुंडांचे धागे दणाणले आहेत. 

 

Post a Comment

Previous Post Next Post