फरार तोतया अधिकारी संकेत कांबळे अखेर पोलिसांच्या जाळ्यात.

  

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

  नेरळ परिसरात अनेकांना सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांचे अमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकांकडून पैसे उकळून लोकांना ठगवणारा व गेली काही वर्षापासुन फरार असलेल्या तोतया अधिकारी संकेत कांबळे यांच्या नेरळ पोलिसांनी  मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले आहे. 

       एक्झिक्युटिव्ह दर्जाचे कपडे तसेच हातामध्ये आय फोन घेऊन अधिकारी वर्गासारखी भाषेचा वापर करून  नेरळ पूर्व भागात भाड्याच्या घरात राहणारा राहणारा संकेत कांबळे हा  मंत्रालयात गृह विभागात वरिष्ठ पदावर नोकरीत आहे असे भासवून खुद्द पोलिसांना विविध पदांची आमिषे दाखवून, तर अनेकांना नोकऱ्याचे आमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकांन कडून पैसे ऊकळत अनेकांकडून मोठ्या आर्थिक रकमा जमा करून नेरळ मधून सन २०१९ पासून फरार झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात संकेत कांबळे याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९०/२०१९  व गु.र.नं. २१२/२०१९  भा.द.वि.सं  कलम ४२०, ४०६, ३४, नुसार नेरळ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर फरार संकेत कांबळे यांच्या विरोधात सातारा कराड पोलीस ठाणे गु.र.नं. २०८/२०१२ आयपीसी ४०८, खैरवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. २०/२००८ आयपीसी १४३, १४७,३३७, ४२७, खैरवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. २५/२००८ आयपीसी ४२०, ४०६, चेंबूर पोलीस ठाणे गु.र.नं. १८७/२००८ आयपीसी ४२०, अंधेरी पोलीस ठाणे गु.र.नं. ५४०/२०१४, आयपीसी ४२०, पनवेल ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २५/२०१४ आयपीसी ४२०, ४०६, पुणे खडकवास पोलीस ठाणे गु.र.नं.६७/२०१६ आयपीसी ४२० प्रमाणे एकूण सात पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती ही समोर आली होती. तर लोकांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकांन कडून पैसे ऊकळत  मोठ्या आर्थिक रकमा जमा करून लोकांना ठगवणारा व सन. २०१९ मधील फसवणूकीच्या दोन गुन्हयातील  नेरळ पोलीसांच्या हिट लिस्टवर असलेला फरार तोतया अधिकारी संकेत कांबळे हा नांव बदलून नवी मुंबई येथे राहात असल्याची गोपनिय माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे यांना मिळताच नेरळ पोलीसांनी दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी नवी मुंबई येथील ए पी एम सी पोलीस ठाणे ह६ीत सापला रचून एकूण सात पोलीस ठाण्यासह नेरळ पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या दोन गुन्ह्यातील फरार तोतया अधिकारी  संकेत कांबळे वय वर्ष ४० याच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असुन, तोतया अधिकारी  संकेत कांबळे याला ३ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post