दोघां परप्रांतियाकडुन 14 कि.गांजा जप्त , स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - इंचलकरंजी येथे असलेल्या कबनूर ते पंचगंगा मार्गावर गांजा विक्री साठी आलेल्या नाथ पुषा माझी (वय33.रा.ताडरंग पो.अंगूर जि.गजपती रा.उडिसा ) आणि पिन्युएल रैत (वय 19.रा.सिकाबाडी पो.संबलपूर जि.गजपती रा.उडिसा) या दोघां परप्रांतियांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानी ताब्यात घेऊन त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एमपीडीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.  

अधिक माहिती अशी की,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या निमीत्ताने कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेले अवैद्य व्यवसाय त्याच बरोबर गांजाचा अंमली पदार्थांचा साठा करून विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून अंमली पदार्थांचा साठा करून विक्री करीत असलेल्यांची माहिती घेत असताना या पथकातील पोलिसांना कबनूर ते पंचगंगा या मार्गावर दोघे इसम गांजा विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्याची करून त्या परिसरात मंगळवार दि.03/09/2024 रोजी सायंकाळी सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या दोन  बँगेची झडती घेतली असता त्यात 3 लाख 5 हजार आठशे रुपये किमंतीचा 14 कि.गांजा अंमली पदार्थ आढ़ळल्याने या  मुद्देमालासह दोन मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्री.निकेश खाटमोडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलिस कृष्णात पिंगळे,अशोक पवार,संजय हुबे,प्रकाश पाटील,अमित सर्जे,राजेश राठोड ,राजू येडगे ,महादेव कुराडे,शिवाजी मठपती आणि हंबीर अतिग्रे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post