प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ : साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन बेडकिहाळ च्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मंडळाचे जेष्ठ सल्लागार व माजी अध्यक्ष म्हणून श्री प्रकाश पाटील किणीकर होते. प्रमुख अतिथी श्री एम.एस.चौगुले, श्री बंडाकाका जोशी, व मंडळाचे अध्यक्ष श्री. डी.एस. दाभाडे सर. सभेचे आयोजन मराठी शाळा शांतीनगर बेडकिहाळ सर्कल येथे करण्यात आले होते.
सभेला उपस्थीत गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि वेगवेगळय़ा संघ संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. काही जनांनी आपले श्रध्दांजलीपर मनोगते व्यक्त केले.त्यात श्रीमान आर जी डोमणे. बाळासाहेब शिंदे. उपाध्ये, बंडाकाका जोशी, श्री शुरेश देसाई, ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री श्री चौगुले, कुमारी आश्वीणी चौगुले यांनी मनोगते व्यक्त केले. प्रस्ताविक प्रमोद पाटील यांनी केले .कार्यक्रमाची सुरूवात फोटो पुजनाने केली.वमनोगतातून व्यक्त झालेल्या विचारांमुळे आश्रू आसनावर झाले.असे भावनिकदृष्ट्या उतकृष्ट मनोगते प्रत्येकांनी व्यक्त केली. सुत्रसंचलन गजानन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे सेक्रेटरी श्री राजू कोडदेवर यांनी मानले.