आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.  या घटनेत एका पोलीस कर्चचाऱ्यासह आरोपीचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. 

नेमकं काय घडलं..?

ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या आहेत यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर आहे. यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत. 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता.बदलापूर येथील एका खासगी शाळेतील दोन चार वर्षीय चिमुकल्या मुलींवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. 

  या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडीत मुलीच्या पालकांची तक्रार न घेता पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवल्यानं मोठा गदारोळ माजला होता. या विरोधात बदलापूरकर नागरिक मोठ्या संख्येनं रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post