अलीम बेग ग्लोबल महाराष्ट्र समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद- येथील समाजसेवक अलीम बेग यांना उज्वल महाराष्ट्रातर्फे ग्लोबल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक येरमे निवृत्त न्यायाधीश दर्शन सिंग बेदी, गब्बर ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी, हफीज अली, एजाज देशमुख, सलीम चिस्ती नबी पटेल यांच्या हस्ते समाजसेवक अलीम बेग यांना मौलाना आझाद सेंटर येथे सन्मानित करण्यात आलेले आहेत.

अलिम बेग हे वीस वर्षापासून औरंगाबाद शहरात समाजसेवा करीत असून गोरगरीब लोकांना वेळोवेळी मदत करून सहकार्य करीत आहेत तसेच घाटी दवाखान्यात रुग्णांची विचारपूस करून त्यांना औषध पुरवठा करून देणे,तसेच काही लोक खोटी तक्रार देऊन लोकांना पोलीस स्टेशनमध्ये नाहक त्रास देणाऱ्याची  काढून त्यांची मदत करीत करतात.तसेच गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी किंवा शैक्षणिक साठी सतत धाव घेत आहेत. या कार्याची दखल घेत साप्ताहिक उज्वल महाराष्ट्र तर्फे गोलोबल समाज रत्न पुरस्काराने अलीम बेग यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत यावेळी अलीम बेग यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना शुभेच्छा च्या वर्षात करण्यात येत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post