अतिग्रे उपसरपंच पदी श्री भगवान पाटील ( बापू )यांची बिनविरोध निवड

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे : 

 हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे ग्रामपंचायत उपसरपंच पदी ज्येष्ठ सदस्य श्री भगवान पाटील बापू यांची बिनविरोध निवड करण्यात आली भगवान पाटील हे गेल्या 30 वर्षापासून राजकारणात व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांचे शिक्षण दहावी-बारावी शिक्षणानंतर त्यांनी सरकारी कळंबा आयटीआय मध्ये फिटर या ट्रेड चे शिक्षण पूर्ण केले व नंतर नामांकित अशा मनोग्राफ कंपनीत त्यांनी नोकरी केली 

त्यानंतर गावा शेजारील साजणी मध्ये नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी मध्ये पंधरा वर्षे युनियन अध्यक्षपदी काम पाहिले त्यानंतर रुकडी येथे वीट भट्टीचे स्वतःचा व्यवसाय सुरू केला व ट्रॅक्टर आणि व्यवसाय मध्ये त्यांनी पदार्पण केले कालांतराने अतिग्रे गावच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी भाग घेतला तसेच त्यांनी स्वतः नदीपासून पाईपलाईन करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवले इचलकरंजी येथील यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहिले तसेच अतिग्रे गावचे तंटामुक्त उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले म्हणूनच त्यांना त्यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून अतिग्रे येथील नागरिकांनी सन 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आणले आणि प्रभागाची विकासाची सूत्र हाती घेतली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री बाबासो पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्री सुशांत वड्ड यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी श्री भगवान पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष तथा सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी केली यावेळी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला 

   यावेळी माझी उपसरपंच श्री बाबासो पाटील, सदस्या सौ छाया पाटील, कलावती गुरव, दिपाली पाटील, कल्पना पाटील , अक्काताई शिंदे, सदस्य अनिरुद्ध कांबळे ,नितीन पाटील ,राजेंद्र कांबळे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे, राजश्री शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्री श्रीधर पाटील ,पांडुरंग पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील ,तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, धनाजी पाटील,   सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे ,संजय चौगुले, अमर पाटील, उत्तम पाटील ,भरत शिंदे, प्रशांत गुरव, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी श्री भगवान पाटील यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला


Post a Comment

Previous Post Next Post