नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर शाळकरी तीन मुलांना कार ने उडविले. दोन गंभीर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

   कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एका कारचालकाने नेरळ विद्यामंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांना . गंभीर दुखापत झाली असून, कु. मयूर मोहन पारधी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर कारचालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

  नेरळ -  माथेरान घाट  रस्त्यावरील जुमापट्टी  जवळील धस वाडीतील राहणारे कु. मयूर मोहन पारधी, कु.भगवान सखाराम पारधी व कु. विशाल आलो दरोडा हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असुन, नेहमी प्रमाणे सकाळचे सुमारा शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी साडे सात वाजण्याचे सुमारास नेरळ विद्या मंदिर शाळेत कर्जत - कल्याण राज्यमार्गावरून पायी जात असताना, अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे  त्यांची पत्नी व नऊ वर्षाचा पुतण्यासह  सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ येथून अबरनाथ येथे त्यांची ईरटीका कार क्र. एम एच ०५ सी वी २८३४ ने जाताना नेरळ पोलीस ठाण्याच्या  हेकच्या अंतरावर असलेल्या पटेल मार्ट येथे कु. मयूर मोहन पारधी वय वर्ष १५, १० महिने इयत्ता ११ वी, कु. विशाल आलो दरोडा वय वर्ष १७, ०३ महिने इयत्ता १२ वी, कु. भगवान सखाराम पारधी वय वर्ष १७, ०५ महिने इयत्ता १२वी  यांना धडक दिल्याने आपघात झाला . 

सदर आपघातातील शाळकरी मुलांना उपचाराठी प्रथम नेरळ येथील डॉ. शेवाळे यांच्या कडे नेले असता, त्यांना पुढील उपचारा करीता बदलापूर येथील धन्वंतरी रुगणालयात नेण्यात आले आहे. तर कु. मयुर महोन पारधी यांला डोंबिवली येथील एम स रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर नेरळ पोलीसांनी  ईरटीका कारसह गाडी चालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असुन, नेरळ पोलीस ठाण्यात आपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सदर झालेला आपघात  व कु. मयुर महोन पारधी यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाता मधील जखमी कु. विशाल आलो दरोडा, कु. भगवान सखाराम पारधी, व मयत  कु. मयूर मोहन पारधी हे आदिवासी समजातील असुन या घटनेमुळे आदिवासी समजावर मोठया प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

 चालक लोचन धुरी यांनी सुरुवातीपासून या अपघातात सामजस्याची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे कबूल केल्याचे व लोचन यांची पत्नी जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून सोबत गेल्याची व  माहिती समोर येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post