प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरान मध्ये नो वेहकल झोन असल्याने हाथ - रिक्षाच्या माध्यमातून माणूस माणसाला खेचून प्रवासी वाहतूक केली जात होती. माणूस माणसाला खेचून नेणारी मानवीप्रते विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचीकेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या ई रिक्षाचा रस्त्याच्या धक्क्याला चाक लागून अपघात होऊन रिक्षा पलटी झाली.यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा आपघात मोबाईलवर चालकाच्या निष्काळजीपणे बोलत असल्याने झाल्याचे बोलले जात आहे.
दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळचे सुमारास ईमाथेरान मधील हुतात्मा स्मारक येथील ई - रिक्षा स्टँड कडून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याचे सुमारास 16ई - रिक्षा क्र. १६ ही दस्तुरी नाका येथील ई - रिक्षा स्टँड कडे निघाली होती. या प्रवासा दरम्यान रिक्षामध्ये एक पुरुष, महिला व एक छोटा मुलगा बसला होता. मात्र सदर ई - रिक्षा चालक हा सदर ई - रिक्षा चालवताना निष्काळजीपणाने मोबाईलवर बोलत असल्यामुळे वेग समजला नसल्यामुळे मायरा पॉईंट जवळील तयाब लॉज जवळ ई -रिक्षा ही धक्क्याला लागल्यामुळे ती पलटी झाली होती.
सदर ई - रिक्षामधील बसलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी असलेले सीताराम कुंभार व संतोष पवार व काही लोकांनी धाव घेत सदर ई -रिक्षा उभी करत ई -रिक्षामध्ये बसलेल्या पर्यटकांना बाहेर काढले आहे. या तर सदर आपघात हा ई - रिक्षाचालक याच्या रिक्षाचा वेग जास्त असल्याचा व त्यात मध्येच चालक हा निष्काळजीपणे मोबाईलवर बोलत असल्याचे बोलले जात असुन, सदर आपघातामध्ये पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून चालकाच्या डोक्याला मार लागला आहे.तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.