प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:-राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. असे असले तरी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत मध्यम व जोरदर स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तर गुजरातवर सक्रिय आहे. समुद्रसपाटीवरील वाऱ्याची द्रोणिका रेषा दक्षिण गुजरात ते मध्य केरळ किनारपट्टी समांतर आहे. आज मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज रायगड जिल्हा पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच २४ तासात १२ सेंटीमीटर पेक्षा जास्त तर या जिल्ह्यांच्या मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
आज पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट दिला आहे.*
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस तर रायगड रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट भागात खूप जोरदार तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. २९ ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात, जळगाव छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३० व ३१ ऑगस्टला पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३१ तारखेला दक्षिण मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात व लगतच्या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.