प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिये येथे रहात असलेल्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा गुरुवार दि.22/08/2024 रोजी दुपारी बाराच्या सुमारास शिये येथील रामनगर येथे असलेल्या पटकुडी नावाच्या ओढ़यात गंभीर जखमी अवस्थेत आढ़ळल्याने तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा सव्वा दोनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत मुलगी रा.सबार जि.कैमुर बिहार राज्यातील असून तिचे आई वडील शिये येथे कंन्स्ट्रकशन व्यावसायिकाकडे नोकरीस आहेत.बुधवारी तिचे आई वडील कामाला जात असताना घरी असलेल्या मुलीच्या मामाला मुलीकडे लक्ष देण्यास सांगून ते कामाला गेले त्या वेळी मुलीचा मामा झोपला असताना सदर मुलगी घरा बाहेर पडल्याचे समजते.तिची आई घरी आल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे पाहुन तिचा शोध घेत असताना सदर मुलगी पटकुडी नावाच्या ओढ़यात जखमी अवस्थेत मिळाल्याने तिला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारा पूर्वी मृत्यु झाला.या घटनेची माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलिस स्टाफ मोठ्या संख्येने शवविच्छेदन विभागा जवळ तैनात करण्यात आला होता.या घटनेने कोल्हापूर शहर हादरुन गेले.या घटनेची माहिती समजताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी सीपीआर चौकात निषेध करून संशयीत व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात करुन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आले.